एक्स्प्लोर
लाईव्ह टीव्हीव्हिडीओशॉर्ट व्हिडीओवेब स्टोरिज्फोटो गॅलरीपॉडकास्टमुव्ही रिव्ह्यू
यूजफुल
होम लोन EMI कॅलक्यूलेटर बीएमआय कॅलक्यूलेटर वय मोजा/ वय कॅलक्यूलेटर एज्युकेशन लोन EMI कॅलक्यूलेटर कार लोन EMI कॅलक्यूलेटर पर्सनल लोन EMI कॅलक्यूलेटर पेट्रोलचे दर डिझेलचे दर
मुख्यपृष्ठकरमणूकJaqueline Fernandez: जॅकलिन फर्नांडिस दुर्मिळ आजारानं ग्रस्त असलेल्या 11 महिन्यांच्या मोहम्मदसाठी ठरली देवदूत; उचलला उपचाराचा संपूर्ण खर्च
Jaqueline Fernandez: भिवंडीतील एका दुर्मिळ आजारान ग्रस्त असलेल्या लहानग्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस देवदूत ठरली आहे.
By : एबीपी माझा वेब टीम|Updated at : 20 Sep 2025 01:34 PM (IST)

Jaqueline Fernandez
Source : ABP Majha
Jaqueline Fernandez: बॉलिवूड (Bollywood News) अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसनं (Jaqueline Fernandez) मानवतेचं उदाहरण घालून सर्वांची मनं जिंकली आहेत. अलिकडेच जॅकलिननं एका दुर्मिळ आजारानं ग्रस्त असलेल्या बाळाची भेट घेतली. तिनं त्या बाळासोबत आणि त्याच्या कुटुंबासोबत काही वेळही घालवला. तर, बाळाच्या उपचाराचा संपूर्ण खर्च उचलण्याची जबाबदारीही स्विकारली. अभिनेत्रीनं तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती बाळाशी खेळताना दिसतेय.
भिवंडीतील एका दुर्मिळ आजारान ग्रस्त असलेल्या लहानग्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस देवदूत ठरली आहे. हायड्रोसिफलसग्रस्त बाळाच्या उपचाराचा संपूर्ण खर्च जॅकलिननं उचलला आहे.
भिवंडीतील नासिर शेख यांचा 11 महिन्यांचा मुलगा मोहम्मद मेहबूब शेख जन्मापासून हायड्रोसिफलस या गंभीर आजारानं ग्रस्त आहे. या आजारात डोक्यात पाणी साचत असल्यानं डोक्याचा आकार असामान्यरीत्या वाढतो. सध्या या बाळाच्या डोक्याचं वजन तब्बल 10 ते 12 किलो आहे.
View this post on Instagram
मजुरी करून पाच मुलांचं संगोपन करणारे नासिर शेख यांना उपचाराचा 15 ते 20 लाख रुपयांचा खर्च न परवडणारा आहे. अशा कठीण परिस्थितीत सामाजिक कार्यकर्ते हुसैन मंसुरी यांनी ही बाब समाजासमोर आणली. ही हृदयस्पर्शी गोष्ट बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या कानावर गेल्यानंतर तिनं स्वतः पुढाकार घेत देवदूताप्रमाणे मदतीचा हात दिला. जॅकलिननं मोहम्मद मेहबूब शेखच्या संपूर्ण उपचाराचा खर्च उचलण्याची जबाबदारी स्विकारली.
सध्या या लहानग्याचा उपचार मुंबईतील लिलावती रुग्णालयात सुरू आहे. अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसनं रुग्णालयात प्रत्यक्ष भेट देऊन बाळाची भेट घेतली. तिच्या मायेनं आणि आधारानं नासिर शेख यांचं संपूर्ण कुटुंब कृतज्ञ झालं आहे. स्थानिकांनी जॅकलिन फर्नांडिसच्या या मदतीचं मनापासून कौतुक केलं. तसेच, "अभिनेत्रीच्या मदतीमुळे मुलगा लवकर बरा होईल...", अशी आशाही व्यक्त केली.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
Calculate The Age Through Age Calculator
Published at : 20 Sep 2025 01:34 PM (IST)
Tags :
Bollywood News Jaqueline Fernandez BOLLYWOOD
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
महत्त्वाच्या बातम्या
Advertisement
Advertisement
Advertisement
व्हिडीओ
फोटो गॅलरी
ट्रेडिंग पर्याय
एबीपी माझा वेब टीम
Marathwada Liberation Day: मराठवाडा मुक्ती संग्रामदिन: स्थलांतरित मराठवाडा – चिंता व चिंतन
Opinion